
0
6
3
2
1
7
भोलानाथ
भोलानाथ भोलानाथ
पडू दे रे खुप पाऊस
चिखलामध्ये खेळायची
भागेल माझी हौस
भोलानाथ भोलानाथ
वाजव तू रे डमरू
तालावर त्याच्या मी रे
नाचेल तुरूतुरू
भोलानाथ भोलानाथ
करशील का माझ्याशी गट्टी
दोघे मिळून खेळू आपण
नाही करणार कट्टी
भोलानाथ भोलानाथ
भीती वाटते मला
साप तुझ्या गळ्यामध्ये
कसा रे रेंगाळला
भोलानाथ भोलानाथ
त्रिशुल तुझ्या हाती
सत्व, रज, तम गुण
सांग कसे दर्शविती
श्रीमती सुलोचना लडवे
ता. जि.अमरावती
========
0
6
3
2
1
7



