बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग: शुक्रवार दि. २ अॉक्टोबर २०२६ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या सुनियोजनातून व मार्गदर्शनातून महात्मा गांधी यांची १५७ वी व लालबहादूर शास्त्री यांची १२२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला व प्रतिमेचे पूजन केले. तसेच उपस्थित सर्वांनी प्रतिमेचे पूजन केले.
याप्रसंगी सांस्कृतिक समिती प्रमुख धनंजय भगत सर यांनी आपल्या भाषणातून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याची महती सांगितली. कार्यक्रमाला मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी अजित नाईक सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी सुरेंद्र गायकवाड, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.



