Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनधाराशिवपरीक्षण लेखमराठवाडासाहित्यगंध

राजा राणीचा अधुरा संसार ..!!

श्रीमती कल्पना हरी सुरवसे ता उमरगा जिल्हा धाराशिव.

0 4 8 2 9 7

राजा राणीचा अधुरा संसार ..!!

‘खूप आनंदी होते मी जेव्हा माझा जोडीदार माझ्या आयुष्यात आला.’ होत वय लहान कळायच तर नाही काही. पण आईवडीलांचे संस्कार होते छान. म्हणून जुळवून घेत गेले मोठे लहान सगळ्यांना देत गेले आदर आणि मान ..! माझा सखा होता खूप हुशार व देखणा त्यांना किती पाहिले तरी मन मात्र भरेना.. खूप खुश होतो आम्ही आमच्या जिवनात , एकमेकांसोबत जात होते दिवस आनंदात , रमून गेलो आम्ही आमच्या नविन संसारात .. त्यात दिले देवाने अम्हाला आर्शिवाद प्रेम स्वरूपी जन्मले गोंडस बाळ .. देवाने दिले मला मातृत्वाच दान .. माझ्या बाळामुळे मिळाले मला नविन जन्म घेतल्याच दान .. आनंदाचे दिवस जात होते छान दुडू.. दुडू पळू लागले पाऊले ते लहान , आमच्या दोघांचा जीव असायचा तो आमचा हिरा हळू .. हळू मोठ होऊ लागला.

देवाच्या कृपेने मी पुन्हा एकदा आई झाले आणि आमचं चौकोणी कुटूंब पूर्ण झाले . इच्छेप्रमाणे आपत्य झाले , अगदी बांबासारखी दिसणारी मुलगी आणि आईसारखा मुलगा , खूप सुखाचा संसार चालू होता . जणू कोणाची तरी नजरच लागेल ….! खरंच अमच्या सुखी संसाराला नजर लागली आणि आमच्या आनंदाला पूर्ण विराम लागलं. होत्याच नव्हत झाल , माझ्या लहानशा बाळाच छत्र हरवलं .. माझ जिवन उध्वस्थ झाल आयुष्य तिथेच थांबल , दुःखाचा डोंगर अमच्यावर कोसळला .. एक स्वप्न पडल आणि त्यात सगळ घडून गेले अस वाटू लागलं.

सोपं नसतं जोडीदार गमवण सगळ्यांत मोठ दुःख असतं. असं वाटलं माझ आयुष्य थांबलय, श्वास थांबला… वाटत होतं स्वःताला संपवाव; नाही तरी जगून तरी काय ? उपयोग पण मला स्वार्थी नव्हतं व्हायचं . माझे चिमुकले त्यांच्याकडे पहिले त्यांचे चेहरे माझ्या समोर दिसू लागले .. जसे काय मला विचारत आहेत अमची काय चुक … त्यांच्यासाठी पुन्हा उभी राहिले. आमचा राजा राणीचा संसार एका क्षणात संपला … एका स्वप्नासारखा .. नऊ वर्ष झाले पण एक क्षण विसर पडत नाही …..!!

श्रीमती कल्पना हरी सुरवसे
ता उमरगा जिल्हा धाराशिव.
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे