
0
6
3
2
1
8
कृष्णसखी
कृष्ण सखीचे रुप मनोहर
विदर्भातून वाहे नित्य चिरंतन
द्वापार युगाचा मथुरा बाजार
कलियुगात आवतार पंचलतिका
चांदुर बाजार माधुर्य प्रेम निरंतन
गोकुळची गोपीनार पंचलतिका
विदर्भात संत गुलाबातून होई साकार
माधुर्य भक्ती पुन्हा घेई आकार
भक्ती-प्रेमाचे मांडी रास
अमृताची होई बरसात
गुलाब तन-मनात कृष्ण रस
पाझर क्षण-क्षणात
कात्यायनी देवी वृत्त साक्षात्कार
गुलाब कृष्ण प्रितीचा लेई शृंगार
माधुर्य भक्तीचा दिव्य अविष्कार
गुलाब कृष्ण पटराणीचा लाभे बहुमान
गुलाब चरणी गोपीची झुके मान!!”
नरेंद्र गंगाराम साबळे
ता. गंगाखेड, जि.परभणी
========
0
6
3
2
1
8



