0
4
8
2
9
7
चंद्रमास
तुझी माझी प्रीत कशी,जगात आहे न्यारी।
तू माझी असूनही ,मी तुझ्याविना भिकारी।।
कुठे कुठे शोधू तुला, या धरणीत गगणात।
फुलाफुलात नाहीगे ,तू आहे का चांदण्यात।।
उसळती लाटा मनी ,तो किनारा सापडेना।
त्या विरह वेदनांचे ,दुःख व्यथा साहवेना।।
बेधुंद वाहती वारे ,चमकती लाख चांदणे।
डोंगर माथ्यावरूनी , तुझेच गातो तराणे।।
हेलकावे सोसतो मी ,भावनांना गे साहूनी।
भरती ओहोटी लागे ,सागरा रुप पाहूनी।।
तव आठवांनी इथे,जगतो जीवन आहे।
पण चंद्रमास होता ,अश्रू नेत्री सदा वाहे।।
कलेकलेनी जीवनी ,अंधकार होत आहे।
जळेल माझे सरण,तू प्रकाश ज्योत आहे।।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा.जि,यवतमाळ
=========
0
4
8
2
9
7



