0
4
8
2
9
0
शान तिरंगा
आन,बान,शान तिरंगा
जपूया,हृदय कोंदणात,
नाव त्याचे,कोरले आहे
भारतीयांच्या मनामनात.
हिरवा रंग, भरभराटीचा
धरती करू,सुजलाम् सुफलाम्,
धनधान्य पिकवी शेतकरी
चिंतीतो साऱ्यांचे मंगलंम.
केशरी रंग,त्याग बलिदानाचा
वंदन करू,अमर शहीदांना,
देशभक्तीची ज्योत पेटवू
सलामी देवू,त्यांच्या समर्पना.
पांढरा रंग,मां गल्याचा
शुद्ध आणि पवित्रतेचा,
डाग नको पडायला त्यावर
संदेश,भान ठेवून वागण्याचा.
तिरंगी ध्वजात मधोमध
दिसते शोभून निळे चक्र,
देई आदेश गतिमानतेचा
शत्रूची ओळखी नजरवक्र.
मायादेवी गायकवाड ठोकळ
ता.मानवत, जि.परभणी
0
4
8
2
9
0



