Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 8 7

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : हरणाची जोडी📘*
*🔸मंगळवार : ०३ / फेब्रुवारी /२०२६*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*हरणाची जोडी*

एक दोन एक दोन एक दोन
चांदोबाची गाडी ओढतं कोण…??

तीन चार तीन चार तीन चार
हरणाची जोडी सुंदर फार फार..!!

पाच सहा पाच सहा पाच सहा
चांदोमामाचे गाणे लिहीत राहा …!!

सात आठ सात आठ सात आठ
हरणाच्या गाडीला चांदण्याची वाट..!!

नऊ दहा नऊ दहा नऊ दहा
हरणाची जोडी जवळून पाहा..!!

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🦌🌹🦌➿➿➿➿
*हरणाची जोडी*

हरणाची जोडी दिसतेय बघा छान
टवकारून पाहे त्यांचे दोन्हीं कान

धावधाव धावते शिकार होत नाही
चपळता गुण अंगात संचारत राही

शिकाऱ्याची चाहूल लागता त्याला
सैरावैरा पळे भुई कमी पडे ज्याला

तीक्ष्ण नजर त्याची शत्रूला पारखी
जीवाची भीती तया वाटते सारखी

कळपाने फिरती ती हरीण बिचारी
चुकून भटकली तयाला कोण तारी

हरणाची जोडी तुडवी ते माळरान
पायाखाली गेले असेल किती धान

चपळ तितका भित्रा स्वभाव असे
आम्हां मुलांशी साधर्म्य गुण दिसे

हरणाची जोडी पाहू लागली गोडी
गुण आत्मसात, प्रेरणा घेऊ थोडी

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🦌🌹🦌➿➿➿➿
*हरणाची जोडी*

चांदोबाच्या गाडीला
हरणाची जोडी
जोडली हरणाला
सोनेरी गाडी ॥१॥

सोनेरी गाडीतून
चांदोबा आला
निळ्या आभाळातून
चांदण्यानी पाहिला ॥२॥

हरणाच्या पाठीवर
सोनेरी शाल
सोनेरी शालीवर
ठिपके लाल ॥३॥

हरणाच्या शेपटीला
झुबकेदार गोंडा
गोंड्याच्या टोकाला
चांदण्यांची झाल ॥४॥

हरणाच्या जोडीला
तारकांची झालर
डौलदार मानेला
घुंगरू नक्षीदार ॥५॥

पाहुन जोडीला सारे
झाले गारे गार
चांदोबा काय रे
तुझी मिजास फार॥६॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🦌🌹🦌➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हरणाची जोडी*

आली आली आमच्या मळ्यात
हरणाची जोडी हरणाची जोडी
थबकत थबकत चालत होती
घाबरली होती थोडी थोडी

मळा होता हिरवागार
ओढ्याला पाणी निळेशार
वाहणारा वारा खोडकर फार
आनंद झाला त्यांना फार

हळूहळू शिरले मक्यात
खाऊ लागले जोरात
ससा उभा ठाकला पुढ्यात
म्हणाला जाऊ गाजराच्या मळ्यात

गाजराने भरले पोट
पाणी पिले घोटघोट
चालू लागले पटपट
समोर दिसले पोपट

पोपटाने नेले पेरूच्या शेतात
पेरू होते गुलाबी रंगात
खाल्ले त्यांनी एका क्षणात
हरणांचा कळप दिसला वनात

गेले त्यांना भेटायला
नेलेला खाऊ लागले द्यायला
खाऊ पाहून आनंद वाटला
हरणाची जोडी गेली हुंदडायला

*मीनाक्षी काटकर*
*दारव्हा यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🦌🌹🦌➿➿➿➿
*हरणाची जोडी*

हिरवा हिरवा रान
हिरवा हिरवा गवत
तिथे हरणाची जोडी
होती ती चरत ,,,,,

साऱ्या रानात हिरवा गवत
तिथे सुंदर होती दिसत
जिकडे तिकडे हिरवा रान
त्यांचे दिसायचे सुंदर पान

राघो मैना एका झाडावर
बदले होते फांदीवर
फांदीला होते लाल फुले
दिसत होते चूल बुले

हरणाची जोडी होती छान
त्यांचे होते लंबे कान
गिजरे गिजरे होते डोळे
उंच बारीक होती मान

त्यांच्यात होती चपळता
खूप जोरात पळायचे
जिथे गवत दिसायचं
तिथेच थांबून जायचे

थोडा खळका होताच
मान उंच करून पहायचे
शिकारी दिसताच
खूप पळ काढायचे

कळपा कळपाने फिरायचे
एक जुटीने राहायचे
कोणताही संकट येताच
एकमेकाला सांगायचे

हरणी माझ्या सखी
दोस्ती होती पक्की
जवळ जवळ यायचे
खायला मी द्यायचे

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🦌🌹🦌➿➿➿➿
*हरणाची जोडी*

राम आणि शाम
दोघे भाऊ छान
हरणाची जोडी
जसी वेगवान

अभ्यासात हुशार
खेळण्यात वेगवान
व्यवहारात चतुर
असे ते मदतवान

शरीर त्यांच सुदृढ
असे ते ताकदवान
चाल त्यांची डौलदार
असे ते पैलवान

निर्मळ असे त्यांच मन
अभ्यास करी तन मन
प्रत्येक विषयात
त्यांचा असे नंबर वन

त्यांच्यात नम्रता
दिसून यई शालीनता
हरणाची जोडी सम
निरखून येई सुंदरता

*श्री.पुरुषोत्तम ठोंबरे*
*बंधुनगर,झिंगाबाई टाकळी नागपूर*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🦌🌹🦌➿➿➿➿
*हरणाची जोडी*

चांदोबा फिरतो आकाशात
बसून शुभ्र ढगांच्या रथात
रथ ओढते हरणाची जोडी
रथ पळे वाऱ्याच्या वेगात

हिरे ताऱ्यांचे लुकलुक करती
चंद्राच्या रथाची शोभा किती
गुलाबाचे रान हरणे तुडवती
गुलाब लाल छानच दिसती

लांब,टोकदार हरणांचे कान
टवकारती बघा पडता पान
तपकिरी कातडी मऊशार
पाठीवर हो चंदेरी कमान

रथात बसून चांदोबा हसतो
हरणांवर किती माया करतो
कोवळे गवत खाऊ घालतो
झुळझुळ झऱ्याचे पाणी देतो

चंदेरी सोनेरी पंखांच्या पऱ्या
रथात येऊन बसतात जरा
चांदोबा सवे खेळ खेळती
अंगावर शिंपती चांदणचुरा

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🦌🌹🦌➿➿➿➿
*हरणाची जोडी*

या मुलांनो बघा बघा
आली चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला
आहे हरणाची जोडी

सुंदर लांबसडक शिंग
शोभेसाठी घरात लावती
अती चपळ हरणी आवाज
होताच वेगवान पळती

कधी झऱ्याच्या जवळ
कधी गुलाबाच्या रानात
चाऱ्यासाठी फिरती ती
कधी शेत शिवारात

चालत असतात कळपात
एकजूट त्यांची असते फार
मऊ मऊ भासे जणू कापूस
अंग त्यांचे सुंदर ठिपकेदार

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🦌🌹🦌➿➿➿➿
*हरणाची जोडी*

कान टवकारून आली
हरणाची जोडी
पिसारा फुलवून मोर आला
लावू लागला लाडीगोडी.

नका घाबरू तुम्ही
थांबा जरा पळभर
आपण सारे जण
एकाच वनाचे वनचर.

खुशाल खा चारा
देईन मी पहारा
आला कोणी पारधी
करीन सावध आधी.

हरणाची जोडी
चारा खाऊन टम
मोराला बाय बाय
पळाली धूम .

*सौ विमल धर्माधिकारी वाई, सातारा*
*©सदस्या मराठीचे शिवेदार समूह*
➿➿➿➿🦌🌹🦌➿➿➿➿
*हरणाची जोडी*

हरणाची जोडी
जंगलात आली
उड्या मारत
मजेत निघाली

कधी झाडाआड
कधी माळरान
धावण्यात दोघेही
एकच नंबर वन

आई आणि मुलं
असं अनोख नातं
एकत्र हसतांना
बघितले हो इथं

नदीकाठी पाणी
पिताना हर्षात
प्रतिबिंब न्याहाळले
दोघांनी मनात

अरे वा म्हणत
हसली त्यांची जोडी
खेळ रंगला मस्त
खूपच गोडी गोडी

हरणाची जोडी
छान आनंदात
जंगल संपूर्ण
देते दोघांची साथ

*कु माधुरी घनश्याम कावडे*
*वणी जिल्हा यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🦌🌹🦌➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे