Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

पर्यटनाला जाऊ या… देवबाग पाहू या..!

स्वाती मराडे पुणे

0 4 8 2 8 6

माझ्या मायभूमीतून…!

पर्यटनाला जाऊ या… देवबाग पाहू या..!

देवबाग हे कोकणच्या दक्षिण भागात तारकर्ली समुद्रकिनारा आणि कर्ली नदीच्या मध्ये आहे. एका बाजूला हिरवेगार सह्याद्री पर्वत आणि दुसरीकडे निळा अरबी समुद्र. हे सिंधुदुर्ग शहराच्या पश्चिमेस ३४ किमी. अंतरावर आहे. देवबाग हे तारकर्लीपासून केवळ ७ किलोमीटर अंतरावर आहे. देवबागमध्ये पाहण्यासारखे बरेच पॉईंट आहेत. त्यामध्ये कर्ली नदीचा संगम पॉईंट, त्सुनामी आयलैंड, मिनी केरळ, भोगवे बीच, कर्लीची खाडी हे पाहण्यासारखे स्पॉट आहेत. तसेच इथे सीगल पक्षीदेखील पहायला मिळतात.
देवबाग बीचचा समुद्र किनारा लांब आणि चमकत्या पांढऱ्या वाळूचा असल्याने विशेष ठरतो. हे असे ठिकाण आहे जिथे फिरायला जाणे अत्यंत आनंददायी आहे.

वाटेत लागणारा तारकर्ली बीच अत्यंत सुंदर आणि पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. इथल्या वाळूत सापडणारे शंख- शिंपले आणि छोटे-छोटे खेकडे आपले लक्ष वेधून घेतात. तसेच इथे वॉटर स्पोर्ट्समध्ये स्नोकर्लिंग, कयाकिंग, जेट स्की राईड, बम्पर राईड, पॅरासेलिंग, बनाना राईड, स्कूबा डायव्हिंग यासारखे पर्याय उपलब्ध आहेत. याठिकाणी बोटीतून खाडीत नेले जाते आणि इथून वेगवेगळी ठिकाणे दाखवली जातात. बोटीतून समुद्र न्याहाळणे फारच आनंददायी वाटते. यामध्ये देवबाग संगम पॉईंट फार खास आहे. देवबाग आणि कर्ली नदीच्या संगमाचे ठिकाण ‘डेल्टा पॉईंट’ म्हणून ओळखले जाते. अरबी समुद्रात जाऊन मिळणाऱ्या कर्ली नदीचा संगम या ठिकाणी पहायला मिळतो.

बीचवर बोटीतून कर्ली नदीच्या खाडीत गेल्यावर सुंदर असा सनसेट पॉईंट पहायला मिळतो. सभोवतालचा निसर्ग आणि पाण्यात पडणारी सुर्याची किरणे पाहून एक वेगळाच अनुभव मिळतो. देवबागच्या समुद्राचे वैशिष्ट्य म्हणजे कर्ली नदी. ही नदी थेट अरबी समुद्राला येऊन मिळते. ही खाडी पाहिल्यानंतर त्सुनामी आयलैंडवर नेतात. इथे खेकडे पहायला मिळतात. शिवाय माफक दरात छोट्या छोट्या वल्ह्याच्या नौका पहायला मिळतात. ज्या तुम्ही स्वतःसुद्धा चालवू शकता. देवबाग बीचवर बोटीतूनच भोगवे येथील समुद्र पाहता येतो. हा बीच लागून असल्याने देवबागनंतर भोगवे बीचलादेखील भेट देता येते.

राहण्यासाठी इथे बीचसमोर अनेक रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स उपलब्ध आहेत. जिथे अगदी माफक दरात राहता येते. देवबागला मच्छिप्रेमींची तर चंगळ असते. त्यामुळे खवय्ये एकदम खुश असतात. शाकाहारी लोकांना देखील उकडीचे मोदक, उकडी भात, वरण, पापड, लोणचे, आमटी, उसळ भाजी, बटाटे भाजी, चपाती, ताक अशी मेजवानी असते.

स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे