Breaking
क्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

‘सेल्फी विथ हनी बीज’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरीत

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

0 4 8 2 9 4

सेल्फी विथ हनी बीज’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरीत

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

पुणे: सांजभेट आणि वर्ल्ड क्वीन बीज संस्थेतर्फे संयुक्तरित्या एकल व्यक्तींचा मेळावा आणि सेल्फी विथ हनी बीज स्पर्धेतील 50 विजेत्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत, साहित्यिक आणि कलावंत डाॅ.मधुसूदन घाणेकर होते. वर्ल्ड क्वीन बीजच्या अध्यक्ष मधुकर्णिका सारिका सासवडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते सेल्फी विथ हनी बीज स्पर्धेतील 50 विजेत्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने जाहिररित्या सन्मानीत करण्यात आले.

मधुकर्णिका सारिका सासवडे यांनी मधमाशी वाचवा :विश्व वाचवा ‘ या विषयावर मधमाशी प्रेमींना विस्तृत माहिती दिली.’समाजाने मधमाशी वाचवण्याची मोहिम गतिमान करावे असे सांगून ‘ समाजाने एकल व्यक्तिंना सातत्याने दिलासा द्यावा ‘असे आवाहन डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.याप्रसंगी साहित्य गौरव संस्थेच्या कार्याध्यक्ष मंदाताई नाईक, तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष प्रिया दामले , युनिव्हर्सल युथच्या सचिव सुचेता प्रभुदेसाई, ज्येष्ठ कलावंत अरुणा कोठुळे, महिला सन्मान संस्थेच्या अध्यक्षा भारती महाडिक, सुप्रसिध्द कवयित्री दीपाराणी गोसावी आदिंनी
मनोगत व्यक्त केले.

मधुकर्णिका सारिका सासवडे, उषा फाल्गुने, रविन्द्र गाडगीळ, शलाका गाडगीळ यांच्या शुभहस्ते डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित डहाळी अनियतकालिकाच्या 537 व्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शहर कार्याध्यक्ष श्रीनिवास तेलंग, बीजेपी ज्येष्ठ नागरिक आघाडी सांस्कृतिक विभागाचे सरचिटणीस श्रीनिवास तेलंग, वसुधा इंटरनॅशनल संस्थेच्याच्या अध्यक्षा वसुधा नाईक आघाडीच्या कवयित्री ऋचा थत्ते,मधुरंगच्या उपाध्यक्ष मेघना घाणेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

अजिता मुळीक, पुरुषोत्तम कुंटे, योगेश हरणे, गणेश जामखेडकर, सुधाकर नाईक यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. उषा फाल्गुने यांचे शीळवादन, दीपापाराणी गोसावी आणि सुचेता प्रभुदेसाई यांचे काव्य.सादरीकरण , शलाका गाडगीळ यांचे गायन , अरुणा कोठुळे,यांच्यामुळे कार्यक्रमाची
रंगत वाढली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे