गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, केशव माधव विश्वस्त मंडळाचा उपक्रम
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, केशव माधव विश्वस्त मंडळाचा उपक्रम
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे-दि.(प्रतिनिधी) कर्वेनगर भागात कार्यरत असलेल्या आणि विविध सामाजिक उपक्रम राबवणा-या “केशव माधव” विश्वस्त मंडळाच्या निधीमधून दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच साजरा करण्यात आला.
अभिजात माध्यमिक, ज्ञानदा प्रशाला आणि सरस्वती विद्या मंदिर या शाळांमधील दहावीचे यशवंत विद्यार्थी-विद्यार्थिनीं समृद्धी सोलापुरे, परमेश्वरी निकम, श्रेयस कदम, विराज मालपोटे, तनुजा कांबळे, कीर्ती निंबाळे, सक्षम खरात , तुषार कड, अनिकेत कोळी, अथर्व चव्हाण, ऋतुजा पवार, .प्रियांका वाव्हुळे यांना प्रशस्ती पत्रक, १००१ रुपये रोख रक्कम,आणि ” जिद्दीची लोभस रूपे ” हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास महाराष्ट्र एज्युकेशन सोसयटीचे उपाध्यक्ष, व्हिजन स्कूलचे संस्थापक संचालक मा. प्रदीप नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच त्यांचे पालक व वर्गशिक्षक यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदीप नाईक यांनी विद्यार्थ्यांशी मार्गदर्शनपर संवाद साधला. भारताचे स्व. राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या आयुष्यातील काही दाखले देताना ते म्हणाले, ” प्रत्येक विद्यार्थ्याने यशाचे शिखर गाठतानाच एक चांगला माणूस म्हणून स्वतःला घडवले पाहिजे. परीक्षेतील गुणवत्ते बरोबरच प्रत्यक्ष जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. मेहनत घेतली तर आपल्या आवडीच्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळवता येते” असा यशाचा कानमंत्र देतानाच त्यांनी तिनही शाळांमधील वाचनालयांसाठी पुस्तके भेट दिली.
याप्रसंगी ‘केशव माधव विश्वस्त निधी’चे अध्यक्ष सदानंद भागवत, अभिजात एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा अमला भागवत, मुख्याध्यापिका पूर्वा म्हाळगी, ज्ञानदा शाळेचे अध्यक्ष उदयन पाठक, सरस्वती विद्यामंदिर शाळेचे अध्यक्ष राजेश भांडारकर तसेच तिन्ही संस्थांचे सचिव, शैक्षणिक सल्लागार , मुख्याध्यापक, सर्व पदाधिकारी सुप्रिया पालकर, मनोज शेंडे, अरविंद देशपांडे, कविता शेंडे, सुनील वाटवे, स्वाती कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी कुलकर्णी यांनी केले.आभार श्रद्धा पैठणकर यांनी मानले..सरस्वती वंदनेला अनिल खाडिलकर यांनी शंख नादाची साथ केली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.



