Breaking
कविताक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रमुंबई

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना ‘मो.रफी जन्मशताब्दी पुरस्कार’ प्रदान

वसुधा नाईक, पुणे

0 4 8 2 9 4

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना ‘मो.रफी जन्मशताब्दी पुरस्कार’ प्रदान

वसुधा नाईक, पुणे

पुणे :19 ऑगस्ट 2024 – ज्येष्ठ गायक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेतर्फे संस्थापक, अध्यक्ष आणि अभिनेत्री प्रिया प्रमोद दामले यांच्या शुभहस्ते’ तितिक्षा इंटरनॅशनल मोहम्मद रफी जन्मशताब्दी पुरस्कार ‘प्रदान करण्यात आला. ” डाॅ.मधुसूदन घाणेकर गेल्या सुमारे 6 दशकांपासून मोहम्मद रफी यांची गाणी देशविदेशात सादर करुन रसिकांचे मनोरंजन करीत आहेत

2014 मधे डाॅ.घाणेकर यांनी मोहम्मद रफी यांची सलग 112 गाणी सादर करुन विश्वविक्रम केला.त्यांच्या या योगदानासाठी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा मोहम्मद रफी जन्मशताब्दी पुरस्कार प्रदान केला जात आहे.” असे पुरस्कार प्रदान करताना प्रिया दामले यांनी सांगितले. ‘मी रफींच्या गाण्यांचा उपासक असून त्यांच्या गाण्यांतून पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळतो. गेल्या शतकावर रफींच्या गाण्यांचा प्रभाव हा रसिकांच्या जीवनात दुर्दम्य आशावाद निर्माण करण्यास निश्चितच प्रेरणादायी ठरला.” असे प्रतिपादन डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी पुरस्काराला उत्तर देताना केले.

पुरस्कारानंतर डाॅ.घाणेकर यांनी ‘ फिर रफी ‘ हा रफींच्या गाजलेल्या गाण्यांचा आविष्कार सादर केला. चाहुंगा मै तुझे, बहारो फूल बरसाओ, तुझको पुकारे मेरा प्यार , तुमने किसी की जान को.., सुहानी रात ढल चुकी आदि गाणी सादर करुन रसिकांची मने जिंकली.जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंदाताई नाईक, अध्यक्ष स्थानी वसुधा इंटरनॅशनल संस्थेच्या अध्यक्ष वसुधा नाईक ,भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या शहर कार्याध्यक्ष भारती महाडिक आणि रंगकर्मी सतीश इंदापूरकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

दीपाराणी गोसावी, सारिका सासवडे, विजय सातपुते, चंद्रकांत पोपळगट, कविता घोरपडे आदि विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही डाॅ.घाणेकर यांच्या संदर्भात गौरवपर भाषणे केली.प्रारंभी शलाका गाडगीळ यांनी स्वागत गीत सादर केले. सुवर्णा जाधव यांनी सूत्रसंचालन केले. सहसचिव बालकवी अजया मुळीक यांनी आभार मानले. याच कार्यक्रमात डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित डहाळी अनितकालिकाच्या 555 व्या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या ‘ तुझ्या माझ्या कविता ‘ हा काव्यसंग्रह देखिल प्रकाशित करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे