
0
4
8
2
9
0
ये रे श्रावणा
भिजाया तुझ्यासवे
आसूरले धरेचे तनमन
ये रे श्रावणा ये लवकर
जा रिमझिम बरसून
बरस रे श्नावणा चौफेर
धरणी चिंब चिंब भिजू दे
तुडूंब भर नदी,नाले,ओहळ
बळीराजाच शिवार फुलू दे
मोर नाचेल बघ आनंदाने
गाईगुरांना मिळेल चारा
हिरवगार होईल रान सारं
पक्ष्यांनाही मिळेल आसरा
अडगळीतली छत्री येईल हाती
होईल लहान मोठ्यांची सोबती
ये रे श्नावणा वाट बघतेय तुझी
सारी स्वजीव सृष्टी जगती
प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
==========
0
4
8
2
9
0



