गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना
मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम
*????संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट पंधरा????????????*
*????️विषय : वेदना सांगू कुणाला?????️*
*????गुरूवार : १३ / ०६ /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १३२ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*वेदना सांगू कुणाला..?*
वेदना सांगू कुणाला?
घाव अंतरीचे खोल
बोथट झाल्या संवेदना
नसे जिव्हाळयाची ओल…
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*वेदना सांगू कुणाला*
पापणीच्या आड आहे
खोल अश्रूंचा सागर
वेदना सांगू कुणाला
इथे रीते प्रेमाचे आगर
*सौ माधुरी काळे*
*वणी जिल्हा यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*वेदना सांगू कुणाला ?*
वेदना सांगू कुणाला
जाणणार कोण आहे
सतावतात अंतरात
इथं हर एक माहीर आहे
*डॉ. पद्मा जाधव-वाखुरे, छ. संभाजीनगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*वेदना सांगू कुणाला*
वेदना सांगू कुणाला
माझिया ह्रदयातल्या
थरकाप होतो अंगाचा
क्षोभ होतसे मनाचा
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*वेदना सांगू कुणाला*
ती एक चूक फक्त
सोसावी लागते जन्मभर
वेदना सांगू कुणाला?
विरहात सुकले हे अधर
*सौ अनुराधा भुरे,नांदेड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*वेदना सांगू कुणाला*
तनावरील घाव
दिसती जगाला,
हृदयातील वेदना
सांगू कुणाला?
*सौ स्नेहल अनुप माथनकर*
*ता वरोरा जि चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*वेदना सांगू कुणाला?*
मनी माझ्या असंख्य घाव
केले आप्त स्वकियांनी
वेदना सांगू कशी कुणाला
सगळे एका माळेचे मणी
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*वेदना सांगू कुणाला*
तुजवीन मज नाही कुणी दुजा
मनातील वेदना सांगु कुणाला
जो तो स्वतःतच गुंतलेला
आपला म्हणू कुणाला
*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*वेदना सांगू कुणाला?*
अंतरीच्या वेदना सांगू कुणाला?
भावना झाल्या माझ्या अनावर
ओथंबून आले अश्रूंचे मेघ
परमेश्वरा तूच आता सावर.
*सौ.सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दादरा नगर हवेली.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*वेदना सांगू कुणाला*
सहन करतेय दुःख माझे
रडतेय क्षणा क्षणाला
सगळे आपल्या विश्वात दंग
वेदना सांगू कुणाला
*सौ.शशी मदनकर ,ब्रम्हपुरी*
*जिल्हा_चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*वेदना सांगू कुणाला?*
हृदयातील भावभावनांच्या
वेदना सांगू कुणाला?
डोळ्यातून वाहतात अश्रू रूपाने
मन मात्र सांगेल आतील गुणाला
*सौ.कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*वेदना सांगू कुणाला*
*जळतोय हा अंतरात्मा*
*शब्दबाण वर्मी मारला*
*स्वार्थाच्या दुनियेत या*
*वेदना सांगू कुणाला*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*वेदना सांगू कुणाला?*
काय आहे माझ्या मनात
कळणार नाही सख्या तुला
कधी विचारलास कधी
वेदना सांगू कुणाला
*सौ पुष्पा डोनीवार, चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*वेदना सांगू कुणाला*
मनीच्या असंख्य भावना
मनात या राहिल्या
वेदना सांगू कुणाला
कोणी त्यास ना पाहिल्या
*सौ. हर्षा कुणाल सहारे, नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿????????????➿➿➿➿
*वेदना सांगू कुणाला*
परिस्थितीच्या वेदना सांगू कुणाला
झुरत राहते मी माझ्याच मनाला…
म्हणतेयं मुलीला तर खुप शिकवेन
तिच्या आयुष्याचे रान जोमाने पिकवेन…
*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖



