न्यु मून शाळेत दहीहंडी उत्सव व गोपाळकाला जल्लोषात संपन्न
गोविंदा रे गोपाळाचा जयघोष..
न्यु मून शाळेत दहीहंडी उत्सव व गोपाळकाला जल्लोषात संपन्न
गोविंदा रे गोपाळाचा जयघोष..
तारका रूखमोडे, जिल्हा प्रतिनिधी
अर्जुनी/ मोरगाव: अरे बोल ‘गोपालक्रिष्ण की जय’, असा जयघोष करत श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूल तथा सायन्स ज्युनिअर कॉलेजमध्ये ऊनपावसाच्या रमणीय वातावरणात गोपालकाल्याचा कार्यक्रम दहीहंडी फोडून उत्साहात साजरा करण्यात आला. दहीहंडी कार्यक्रमाचा नर्सरी ते कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. महाराष्ट्रात दहीहंडी उत्सवाची परंपरा आहे .या परंपरेनुसार शाळेत दहीहंडी फोडून गोपालकाला वितरित करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून प्राचार्य राकेश उंदिरवाडे,प्रमुख अतिथी म्हणून संस्थासचिव ओमप्रकाशसिंह पवार, विशाखा समिती सदस्या राधिकाताई भेंडारकर, पालक शिक्षक संघाच्या सदस्या चेतनाताई मेश्राम, नाजुकाताई उंदीरवाडे, पर्यवेक्षिका तारका रुखमोडे उपस्थित होत्या. याप्रसंगी सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णाचे पुजन करण्यात आले. या प्रसंगी राधाकृष्ण वेशभूषा,नृत्य स्पर्धा, तथा दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
गोविंद बोलो हरी गोपाल बोलो…
तसेच वो किसना है …..या गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्याचा आनंद घेतला. शाळेच्या आवारात बांधण्यात आलेली दहीहंडी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकडून तीन थर लावत फोडली गेली.हाथी घोडा पालकी… जय कन्हैया लाल की ….असा जल्लोष विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात केला. अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता बन्सोड यांनी केले तर उपस्थितांचे आभार हिना लांजेवार यांनी मानले . तसेच मदर टेरेसा जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सुरज मोटघरे ,प्रवीण नागपुरे ,चंद्रशेखर लांडगे, त्रिवेणी थेर, लीना चचाने, शीला बोरीकर ,प्रतीक्षा राऊत, सुषमा गायकवाड, प्रतीक्षा डोंगरवार ,पायल बोरकर, मयुरी नाकाडे, छबू बागडे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. सर्व बालगोपालांच्या तथा पालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.



