0
4
8
3
0
0
सावलीत विसावले
कुणाच्या नावावर येथे कुणाचे भले…
कोण रे कुणाच्या सावलीत विसावले…धृ
पैत्रा राखूनिया कुणी टाकतसे फासे…
डोळे मिटूनिया पकडू पाहती मासे…
लबाडाचे कृत्य लबाडालाच फावले…१
कोण रे कुणाच्या सावलीत विसावले…
नाही झाले मायबापाचे नाही कुणाचे…
ध्येय बाळगी फक्त…..स्वार्थी क्षणाचे…
मतलबाविना बाकी कुठे न धावले…२
कोण रे कुणाच्या सावलीत विसावले…
सांभाळ कराया खर्च करणे न लागे…
म्हणूनिया जवळचे….. दूर दूर भागे…
काय सांगू यांनी कित्येकांना सतावले…३
कोण रे कुणाच्या सावलीत विसावले…
मारूनिया उड्या घेती गगनी भरारी…
खेळ माकडांचा चाले बनूनी मदारी…
“सुधाकरा” उगा कुणा फासात गोवले…४
कोण रे कुणाच्या सावलीत विसावले..
सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर नागपूर
0
4
8
3
0
0



