बेल्यात तृतीय पंथीयांवर फौजदारी गुन्हा दाखल
बेला प्रतिनिधी; कैलास साठवणे
बेल्यात तृतीय पंथीयांवर फौजदारी गुन्हा दाखल
आठवडी बाजारात अश्लील हावभाव करून पैसे मागत दुकानदारास मारहाण
तृतीय पंथ्यांकडून जीवे मारण्याचा प्रयत्न
चार तृतीयपंथी आरोपी फरार
बेला प्रतिनिधी; कैलास साठवणे
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
नागपूर/ बेला: (दि २२ डिसे.): उमरेड तालुक्यातील महत्वाचे गाव असलेल्या बेला येथील आठवडी बाजारात गावातील मुख्य मार्गावर तृतीयपंथी यांनी धुमाकूळ घालत स्थानिकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून, अश्लील कृत्य करून सर्व (चार )आरोपी फरार झाले.
नेमके घडले काय..?
बेला मुख्य बाजारात दुकान घेऊन एक इसम बसले असता तृतीयपंथी जबरदस्तीने पैसे मागण्याच्या वादात एक स्थानिक बोलला असता त्याला अमानुष हाथ बुक्क्याने व लाठीने अमानुष मारहाण केली. ही घटना दि 21 ला शनिवार बाजार पेठेत अंदाजे 4.30 वाजता घडल्याची माहिती प्राप्त झाली. श्री कमलेश कांबळे नामक व्यक्तीला तृतीयपंथी यांनी बेदम मारहाण केली, असता फिर्यादी कांबळे यांच्या पत्नीने ताबडतोब बेला पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.
पोलीसांनी अशी केली कारवाई
बेला पोलिसांनी ताबडतोब यंत्रणा हलवून आरोपीचा शोधाशोध करणे सुरू केले. फिर्यादी जखमी झाला आहे. शुल्लक कारणावरून बेदम मारहाण केले असता तृतीयपंथी यांच्या विरोधात बेला पोलीस स्टेशन अंतर्गत कलम 324,325,506 गुन्हा दाखल केला. असून तृतीयपंथी असलेले चार आरोपी फरार आहे पुढील तपास बेला पोलीस स्टेशनचे ठाणेदार सी. पी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बेला बीट जमादार दारासिंग राठोड करीत आहे.



