0
4
8
2
9
7
गर्भझंकार
आई-बाबा, मी तुमचं ऐकलं,
माझंही थोडं ऐका मुलगी नको,
मुलगी नको, सोडा हा हेका.
पक्षाला हक्क उडण्याचा,
कळीला हक्क फुलण्याचा,
सरितेनं सागराला भेटण्याचा,
धरतीन गगनाला मीलनाचा,
मग मला हक्क नाही का?
हे जग पाहण्याचा
आई-बाबा तुम्ही माझा हक्क का हिरावून घ्यावा ?
माझा जन्म तुम्हा नकोसा का व्हावा ?
लग्नात हुंडा द्यावा लागतो म्हणून ?
मुलगी परक्याचं धन म्हणून ?
की समाजातील लांडग्यापासून
मी सुरक्षित नसणार म्हणून ?
चिंता नका करू, येऊ द्या मला जन्माला.
पळवून लावीन एकेका लांडग्याला.
हुंडा घेणाऱ्यांशी मी करणार नाही लग्न
मातृभूमीच्या सेवेतच होईन मी मग्न.
होईन मी सावित्री, होईन मी झाशीची राणी,
सासरही फुलवीन माहेरच्यावाणी.
घेऊ नका निर्णय कळीला खुडण्याचा
नाही तर उरेल मार्ग पश्चातापाचा”
भुमेश्वरी सातपुते खोंडे
ता.उमरेड जि.नागपूर
0
4
8
2
9
7



