0
4
8
2
9
0
अहंकार
नको माणसा मनी वाढवू
नाशवंत अहंकार खोटा
नाही येणार सोबत सोने
गाडी बंगला कागदी नोटा..!!
सांभाळावे सारे नातेगोते
सोडून राग लोभ मनाचा
नको कधी कठोर बोलणे
नको अतिरेक मीपणाचा…!!
मोठ्या मनाने माफ करून
झाले गेले विसरून जावे
धावून जावे संकटात नि
डोळ्यातल्या अश्रूंना पुसावे…!!
श्वासावर ना हक्क कुणाचा
संपती सारी सोडून जातो
माझं माझं म्हणत माणूस
अहंकाराने उगी वागतो…!!
तुझ्या त्या कागदी श्रीमंतीची
नसावी धुंदी माणसा तुला
करावी मदत कधी कधी
अनाथ गरीब याचकाला…!!
समूळ नाश अहंकाराचा
पुराणात झाला कित्येकांचा
व्हावा अंत आतातरी येथे
माणसाच्या दुष्ट प्रवृत्तीचा…!!
राजश्री मिसाळ ढाकणे
जि.बीड
0
4
8
2
9
0



