0
4
8
2
9
0
आम्ही असेच
घोंगावते निवडणूकीचे वारे
शंखनाद होतो प्रचाराचा,
एकनिष्ठ,कार्यकर्ते घेतात गाठीभेटी
नारळ फुटतो शुभारंभाचा.
आम्ही असेच,आहोत दलबदलू
ना इकडचे ना तिकडचे,
सुटते पाणी तोंडाला
गुलाम होतो राजकार्त्याचे.
स्वार्थी या जीवनात
सारेच झालेत खाणारे,
स्वार्थी पणा अति झाला
सारेच झाले लुबाडणारे.
खाणं पिणं होईल बाहेर
ऐष आराम,तर खूप होईल,
मनोरंजनाच्या नावाखाली,
मनसोक्त मजा मात्र करून होईल.
सोडा आता,लाळघोटे पणा
स्वाभिमान नका ठेवू गहान,
लाचारी अन गुलामगिरी मुळे
लोकशाहीचा, नको अपमान.
मायादेवी गायकवाड
मानवत परभणी
0
4
8
2
9
0



