0
4
8
2
9
0
हुडहुडी
कडाक्याची थंडी पडता
हुडहुडी भरतेय अंगात
भल्या पहाटे ऊसतोड
कामगार व्यस्त फडात
गाडी येते रात्री अपरात्री
गाढ निद्रेत असले जरी
काळ वेळ मुळीच नाही
किती थंडी वाजली तरी
दिवसभरात ऊस तोडून
मोळी बांधावी आवळून
खोप,पाचटीत बाळाला
ऊब मिळावी पांघरूण
हुडहुडी भरते सर्वांगाने
अंग ओरबडते पाचटीने
चुरचुर अंगाची वेदनाही
लपवी करी काम वेगाने
प्रतिवर्षास उचल घेऊन
कारखान्याशी गुतलेले
ऊसतोड मजुरांने त्यात
स्वतःस झोकून घेतलेले
बिऱ्हाड पाटीवर घेऊन
वस्ती साकारती शेतात
शिक्षणापासून दुरावती
लेकरं भविष्य अंधारात
बी एस गायकवाड
पालम,जि.परभणी
===========
0
4
8
2
9
0



