
0
4
8
2
9
3
जंतर-मंतर
देवबाप्पा, तुझ्यासारखं
जंतर-मंतर करू दे
पुस्तक पटकन उघडताच
ज्ञानाची दारे उघडू दे
शाळेची घंटा वाजताच
मन होऊ दे तयार
भीती जाईल दूर उडून
अभ्यास वाटेल गंमतदार
गणिताचे प्रश्न नेहमीच
मला वाटतात कठीण
छु मंतर सोपी पद्धतीने
सोडव गुंतागुंतीची वीण
भाषेच्या सुंदर कविता
ओठांवर चालीत नाचू दे
नकाशे, गोष्टी, शब्दवाचन
सगळंच लक्षात राहू दे
परीक्षेच्या दिवशी माझ्यात
आत्मविश्वास भरभरून दे
अभ्यासाची जादू भवताल
नेहमी घर करून राहू दे
माधुरी घनश्याम कावडे
वणी जिल्हा यवतमाळ
0
4
8
2
9
3



