Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनागपूरविदर्भ

शहाकार गृह निर्माण सहकारी सोसायटीचा घोळ उघड होणार

प्रतिनिधी, गजानन ढाकुळकर

0 4 8 2 9 3

शहाकार गृह निर्माण सहकारी सोसायटीचा घोळ उघड होणार

नगर परिषद कडून माहीती प्राप्त झाल्यास कारवाईचा बडगा

प्रतिनिधी, गजानन ढाकुळकर

बिनधास्त न्यूज

नागपूर/हिंगणा: तालुक्यातील हिंगणा,वानाडोंगरी नगर परिषद कार्यालया अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ८ लडी ले आऊट येथील मौजा वानाडोंगरी प.ह.न. ४६ खसरा नंबर ३५० आराजी ०.५४ हे.आर. लेआऊट मधील कर लावण्यात आलेल्या प्लॉट धारकांची नावे कर लावताना त्यांनी सादर केलेले नोंदणीकृत दस्तावेज त्यांचा मालमत्ता क्रमांक व R.L. बांधकाम प्रमाणपत्रे दिले असल्यास त्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत व त्या सोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रति प्राप्त करून घेऊन नगर परिषद कार्यालय व शहाकार गृह निर्माण सहकारी सोसायटीने केलेला भ्रष्टाचार उघड करण्या करीता माहिती अधिकार कार्यकर्ते गजानन ढाकुळकर यांनी नगर परिषद कार्यालयातील जन माहिती अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी श्रीमती प्राची लांजेवार तसेच जन महिती अधिकारी तथा रचना सहाय्यक कु. दिपाली राजगे यांचेकडे दिनांक २५/०२/२०२५ रोजी ई मेल द्वारे व दिनांक ०५/०३/२०२५ रोजी कार्यालयात व्यक्तिशः जोड पत्र अ अर्जाची प्रत सादर करून माहिती अधिकार अधिनियम २००५ नियमा नुसार माहितीची मागणी केली.

त्यावर जन माहिती अधिकारी यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार १० दिवसाच्या आत माहिती शुल्काचे पत्र किंवा ३० दिवसाच्या आत विषया नुसार अर्जदारास माहिती मिळणे अपेक्षित होती. परंतु अर्जाला ३० दिवसाचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही.

त्यामुळे प्रथम अपीलिय अधिकारी तथा मुख्याधिकारी श्री राहुलजी परिहार यांचेकडे दिनांक २७/०३/२०२५ रोजी जोड पत्र ब द्वारे प्रथम अपील ढाकुळकर यांनी सादर केली अपिलीय अधिकारी यांनी अर्जाची तत्काळ दखल घेऊन बुधवार दिनांक २३/०४/२०२५ रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान सुनावणी घेतली या प्रसंगी श्रीमती प्राची लांजेवार व कु. दिपाली राजगे यांच्या तर्फे कपिल डाफे रिकाम्या हाताने कोणतीही माहिती आपिलकर्त्यास देण्या करिता न आणता हजर होते.

या प्रसंगी ढाकुळकर यांनी विषयानुसार माहितीची मागणी केली की आज जोड पत्र सादर करून ६० दिवसाचा कालावधी झाला आहेत. त्यामुळे कोणतेही कारण न देता मला परिपूर्ण माहिती विनामूल्य उपलब्ध करून द्यावी तसेच जन माहिती अधिकारी यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याबाबत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. प्रथम अपिलीय अधिकारी परिहार यांनी अपिलकर्ता ढाकुळकर यांना आपल्या अर्जाचा विचार करून अर्जातील विषयानुसार परिपूर्ण माहिती देण्याचे आश्र्वासित केले आहेत. यावर ढाकुळकर यांनी समाधान व्यक्त केले की या माहितीच्या आधारे शहाकार गृह निर्माण सहकारी सोसायटी व त्याचे पदाधिकारी सतीश भाऊराव शहाकार , राजू सेवकराम शहाकार , अविनाश सेवकराम शहाकार यांच्या अडचणीत वाढ होऊन पुन्हा पोलिस कारवाई सुरू होतील अशी आशा व्यक्त केली आहे.
                                       

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे