कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
ऊसतोडणी दीपककुमार सरदार ता. लोणार जिल्हा बुलढाणा
0
4
8
2
9
0
ऊसतोडणी
पोसलाय ऊस । ऊसाच्या रानात
गर्द पाचटात । काळाभोर ॥१
भरे हुडहुडी । वाजतेय थंडी
घालूनिया बंडी । फाटलेली ॥२
मोकळे आकाश । बोचरा हा वारा
झाला देह सारा । ओलाचिंब ॥३
हातात कोयता । सपासप चाले
कुणी ना बोले । कुणालाही ॥४
एका दणक्यात ।ऊस तो कापला
जीव घाबरला । फडामधी ॥५
ऊसाचे पाचट । हाताला लागते
लक्ष कोण देते । तयाकडे ॥६
ऊसाची तोडणी । जीवाची आबाळ
मुलांची बंडाळ । होत असे ॥७
खोप कुठे बांधू । शोधतो निवारा
देई तो सहारा । निसर्गच ॥८
दीपककुमार सरदार
ता. लोणार जिल्हा बुलढाणा
=======
0
4
8
2
9
0



