
0
5
4
1
0
2
बुवाबाजी
अंगारे धुपारे भानामती केगामती
यातच काय की गुंग झालीय मती
ग्रह तारे राहू केतूवर विश्वास ठेवला
इथेच लोकांचा कार्यभाग बुडाला
हाताच्या रेषा पाहून भविष्य सांगे
घडलेल्या घटनांचे जुळवितो धागे
अंधश्रद्धा ठेवून लोक ही भाळतात
खरे सोडून खोट्याचे नादी लागतात
दोरी गंडा जादू मंतर फुक मारून
अंगातले भूतबाधा लावती पळवून
लोकं ही जाळ्यात फसतात कसे ?
डोळे असून अंधभक्त होई दिसेनासे
कोंबडे बकरे आणि नरबळी देतात
किती कसे कसे लुबाडून ही घेतात
आर्थिक,भावनिक,लैंगिक शोषण
दिसे सामाजिक अधोगतीचे लक्षण
समजावून सांगितले साधूसंतांनी
समाजसुधारक अन् महापुरुषांनी
नका लागू कुणी बुवाच्या नादाला
फसवणूक होईल जाशी तळाला
तरीही लोक सुधारले नाही अजून
बुवाबाजी दिसे उघड प्रकरणातून
बी एस गायकवाड
पालम,परभणी
0
5
4
1
0
2

