नगरसेवक विष्णू कोल्हे यांना 1 कोटी 1 लाखांची मानहानी नोटीस
नागपूर शहर प्रतिनिधी

नगरसेवक विष्णू कोल्हे यांना 1 कोटी 1 लाखांची मानहानी नोटीस
पत्रकारास सोशल मीडियावर अश्लील व अभद्र शिवीगाळ आणि बदनामीकारक वक्तव्ये करणे भोवले
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर: (दि ५ एप्रिल) परिसरात राजकारण आणि पत्रकारितेच्या वर्तुळात खळबळ उडवणारी मोठी घटना समोर आली आहे. नगरसेवक विष्णू कोल्हे यांना पत्रकार सतीश भालेराव यांनी तब्बल 1 कोटी 1 लाखांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. ही नोटीस अॅड. प्रदीप सोमकुवर यांच्या मार्फत बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पत्रकार सतीश भालेराव यांच्या विरोधात सोशल मीडियावर अश्लील व अभद्र शिवीगाळ आणि बदनामीकारक वक्तव्ये केल्याचा गंभीर आरोप नगरसेवक विष्णू कोल्हे यांच्यावर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर ही मोठी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे स्थानिक राजकारणात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पत्रकार संघटनांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे, सतीश भालेराव हे मागील 15 वर्षांपासून RTI च्या माध्यमातून सक्रिय असून, गेल्या 7 वर्षांपासून ते नागपूर जिल्हा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष म्हणून प्रभावीपणे कार्यरत आहेत.
या व्हिडिओ व्हायरल प्रकरणात पुढे कोणता मोठा खुलासा होण्याची व मोठी कारवाई होणार असल्याची, याकडे आता संपूर्ण नागपूर शहराचे व हिंगणा परिसरातील सर्वांचे लक्ष लागले आहे.



