0
4
8
2
9
7
मन गोजिरं पाखरू
मनाला नाही वयमान
खेळ मनात करे सुरू
कधी थोर कधी बालपण
मन गोजिरं पाखरू
मन होई पौर्णिमेचा चंद्र
लागे ढगातून फिरु
चांदण्यातील लुकलुकणारा तारा
मन गोजिरं पाखरू
कधी उंच डोंगरावर
कधी नदी काठावर
मैत्री फुलांशी करते
निसर्गाच्या लाटांवर
मुक्तपणे घेई वेध
सुख शोधे जीवनात
झुले स्वप्न झुल्यावर
रंगे वेगवेगळ्या रंगात
अपेक्षांना देऊन पंख
चल स्वप्नांना साकार करू
ऊंच घेत गगनभरारी
मन गोजिरं पाखरू
अर्चना राजू ईंकने
आरमोरी जि. गडचिरोली
=======
0
4
8
2
9
7



