मी शिक्षक – एक पालक
मी एका ग्रामीण भागातील नामांकित संस्थेच्या भारत विद्यालय बेडगा येथे शिक्षणाचे पवित्र असे कार्य करतो.
शिक्षक हा शिक्षक नसतो फक्त,
तो असतो जीवनाचा खरा ठोकत।
पालकाप्रमाणे जपतो स्वप्न,
शिकवतो प्रेम, शिस्त आणि मन।।
आईसारखा सांभाळतो बाळ,
वडिलांसारखा देतो ज्ञानाचं जाळ।
चूक झाली तर ओरडतो प्रेमानं,
पण पाठीवरती हात ठेवतो समानानं।।
शाळेचा दरवाजा उघडताना,
तो पाहतो प्रत्येकाला आपला समजून।
कधी उपाशी राहतो डब्यातून,
पण शंका सोडवतो हसत हास्यून।।
गणित, विज्ञान, भाषा शिकवतो,
पण त्याहीपलीकडे माणूस घडवतो।
त्याचे स्वप्न असते एकच खरे,
“माझा विद्यार्थी यशस्वी होऊ दे रे!”
शिकवतो तो आत्मविश्वास,
जीवनात लढण्याची खास ताकद खास।
शब्द नसते त्याच्या प्रेमाला मोजणारे,
तो असतो आपल्याला आधार देणारे।
शिक्षक हे केवळ नोकरी नाही,
ती असते सेवा, ती असते कधीही न मिटणारी कहाणी।
पालक जन्म देतो शरीराला,
पण शिक्षक घडवतो आत्मा, संस्काराला।।
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जिल्हा धाराशिव
=========



