Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनचारोळीमहाराष्ट्रसाहित्यगंध

बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 5 7 4 5 0

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*

*🥀विषय : हुकमी एक्का🥀*
*🍂बुधवार : २२ / जुलै /२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*हुकमी एक्का*

*मस्तवाल झालेल्या शासनाला*
*द्यावा लागेल आता धक्का*
*एकजुटीची वज्रमूठ आवळून*
*दाखवू चला हुकमी एक्का*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👍🔰👍➿➿➿➿
*हुकमी एक्का*

नवराबायकोच्या वादविवादात
हुकमी एक्का अश्रुपाताचा
असतो बायकोच्या हातात
खेळताच पाडाव होतो नव-याचा.

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👍🔰👍➿➿➿➿
*हुकमी एक्का*

पत्यातल्या डावाप्रमाणे
चालतो इथे खेळ सारा
चलती प्रमाणे जो खेळेल
तोच असतो इथे हुकमी एक्का*

*गजवंती सुभाष विघ्ने*
*बडनेरा अमरावती*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
➿➿➿➿👍🔰👍➿➿➿➿
*हुकमी एक्का*

ज्याचे हाती हुकमी एक्का
तो जिंकून जातो डाव
बाकी सारे होती हतबल
त्यांचा न लागे कुठे निभाव

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👍🔰👍➿➿➿➿
*हुकमी एक्का*

जग जिंकायला निघालो,
हात रिकामे वाटले.
आई-वडिलांचे संस्कारच,
हुकमी एक्के ठरले.

*अर्चना जगदिश मेहेर*
*ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👍🔰👍➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हुकमी एक्का*

हुकमी एक्का हातात नाही
आपल्या मनामध्ये जपावा
जिद्द,धैर्य,कष्टांनीच जीवनात
पदोपदी प्रत्येक डाव जिंकावा

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👍🔰👍➿➿➿➿
*हुकमी एक्का*

हुकमी एक्का असतात
काही माणसं जीवनात
पालटतात ते,क्षणात नूर
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👍🔰👍➿➿➿➿
*हुकमी एक्का*

हुकमी एक्का जीवनाचा नूर
कधीच जातनाही आयुष्यातून दूर
वेळप्रसंगाला निघतो तो बाहेर
माणुसकीचा असतो निराधार सूर

*सौ.कुसुम पाटील*
* कसबा बावडा कोल्हापूर*
*©️सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👍🔰👍➿➿➿➿
*हुकमी एक्का*

राजकारणाच्या आखाड्यात नेते
एकतरी हुकमी एक्का बाळगून असतात…
वेळप्रसंगी त्याचा करून वापर
बंड करूनी सत्ताधारी होऊन बसतात..

*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿👍🔰👍➿➿➿➿
*हुकमी एक्का*

घरातील कर्ता हुकमी एक्का
दरारा कायम और असतो
मन तयाचे कनवाळूही असते
हाक मारता उपयोगी पडतो

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👍🔰👍➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 4 5 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे