सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा
मुख्य संपादक:राहुल पाटील
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*📘स्पर्धेचा विषय : भेटल्यानंतर📘*
*🔸सोमवार : १८ / ०८ /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*भेटल्यानंतर*
तुझ्या नयनी अनेक स्वप्नांचे इमले
भेटल्यानंतर बांधले स्वप्नांचे मनी बंगले
तुझ्या अचानक जाण्याने ते ढासळले….
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी,जिल्हा – पुणे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀〽️🌀♾️♾️♾️♾️
*भेटल्यानंतर*
भेटण्याआधी वाटत होते
नक्की जुळेल आपली रास
भेटल्यानंतर भ्रम निरास…
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀〽️🌀♾️♾️♾️♾️
*भेटल्यानंतर*
*लेकरांच्या उज्वल भविष्यासाठी*
*देह आईबापाने झिजवला*
*तू भेटल्यानंतर जीव सुखावला*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀〽️🌀♾️♾️♾️♾️
*भेटल्यानंतर*
खूप दिवसांनी मैत्रिण भेटल्यानंतर
आनंदाला आले उधाण .
मधल्या काळाचे मिटले अंतर
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀〽️🌀♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*भेटल्यानंतर*
सर्व गैरसमज होतील दूर
रुसवे फुगवे जातील पळून
सखे एकदा आपण भेटल्यानंतर
*सौ. गौरी नेर्लेकर नेवासा,अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀〽️🌀♾️♾️♾️♾️
*भेटल्यानंतर*
डोळ्यांत तुझ्या स्वप्नांची पाखरे
ओठात अमृताचे झरे
भेटल्यानंतर शून्यच हाती उरले
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀〽️🌀♾️♾️♾️♾️
*भेटल्यानंतर*
सोशल मीडियावर तुझे सौंदर्य
पाहुन कलेजा खल्लास झाला
भेटल्यानंतर भ्रम निरस झाला
*सौ.सुनिता लकीर आंबेकर*
*दादरा आणि नगर हवेली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌀〽️🌀♾️♾️♾️♾️
*भेटल्यानंतर*
आपण भेटल्यानंतर जाऊ गप्पांच्या गावा
बालपणीच्या आठवणीत रंगून जाऊया
तुझ्या माझ्या मैत्रिच्या किस्सा आठवूया
*कंचना मंडपे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀〽️🌀♾️♾️♾️♾️
*भेटल्यानंतर*
भेटल्यानंतर आठवती ते क्षण,
सुख दुःखाचे उभे कणकण,
शब्दांविना डोळ्यांनीच कळावे भाव//
*उर्मिला राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀〽️🌀♾️♾️♾️♾️
*भेटल्यानंतर*
भरले मन करावे रिते
आजही वाटते कितीदा
भेटल्यानंतर तुला एकदा
*अश्विनी आनंदराव जगदाळे*
*ता. केज जि. बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀〽️🌀♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖



