जेसीआय नागपूर रॉयल तर्फे मिस ॲन्ड मिसेस विदर्भ ऑडिशन
8 आणि 10 फेब्रुवारीला होणार आयोजन
जेसीआय नागपूर रॉयल तर्फे मिस ॲन्ड मिसेस विदर्भ ऑडिशन
8 आणि 10 फेब्रुवारीला होणार आयोजन
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर: (दि ३) जेसीआय नागपूर रॉयल यांच्या वतीने मिस अँड मिसेस विदर्भ सीजन 3 ची घोषणा करीत आहे. हे विदर्भातील सर्वाधिक प्रतिक्षित सौंदर्य व व्यक्तिमत्व स्पर्धांपैकी एक असून महिलांच्या सशक्तीकरण, आत्मविश्वास आणि प्रतिभेचा गौरव करण्यासाठी समर्पित आहे. हे प्रतिष्ठित व्यासपीठ केवळ इच्छुक सहभागींच्या व्यावसायिक ग्रुमिंग, प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्व विकासाला चालना देत नाही तर स्टेज ब्रॅडिंग, डिजिटल पोहोच, मीडिया कव्हरेज आणि प्रत्यक्ष सहभागाच्या माध्यमातून प्रायोजक व भागीदारांसाठी मजबूत ब्रँड दृश्यमानता आणि प्रभावी प्रचाराच्या संधी उपलब्ध करून देते.
त्यासाठी राजेश दुबे यांनी पत्रकारांना सांगितले की, येणाऱ्या ८ आणि १० फरवरीला दुपारी 12 वाजता. मल्टीफीट जिम, लॉ कॉलेज चौक, येथे ऑडिशन घेतल्या जाईल. त्यानंतर 14 फरवरीला हॉटेल रिजेंटा जगनाडे चौक येथे पुरस्कार व विजेते घोषित केल्या जाईल. जेसीआय नागपूर रॉयल यांच्यातर्फे पत्रपरिषद घेण्यात आली. त्यावेळी मंचावरील उपस्थित राजेश दुबे, कौस्तुभ गावंडे, कल्याणी जयस्वाल, प्रीती दुबे आणि प्रवीण लांडे यांची उपस्थिती होती.



