Breaking
ई-पेपरकविताधाराशिवमराठवाडासाहित्यगंध

आक्का

डॉ. ज्ञानेश्वर माशाळकर उमरगा, जि. धाराशिव

0 6 3 3 3 3

आक्का

आक्का… तुझी आठवण आजही येते
आक्का म्हणजे मायेचा सागर,
आक्का म्हणजे प्रेमाची धार,
आक्का म्हणजे देवाघरची सावली,
आक्का म्हणजे आमच्या घराचा आधार…
रडताना अलगद डोळे पुसणारी,
दुःखात हळूच हात धरणारी,
“बाळा, काळजी करू नकोस” म्हणत,
मनाला धीर देणारी माझी आक्का…
उशिरा घरी आलो तरी,
रागाचा शब्द कधी नसायचा,
“बाबा, जेवलास का रे?” म्हणत,
दोन घास प्रेमाने भरवायची आक्का…
चुकलो तर प्रेमाने समजवायची,
वेळप्रसंगी योग्य वाट दाखवायची,
स्वतःच्या सुखाचा विचार न करता,
लेकरांसाठी आयुष्य झिजवायची आक्का…
आज तू नाहीस डोळ्यांसमोर,
पण प्रत्येक आठवणीत तूच दिसतेस,
देवघरातील दिव्याच्या ज्योतीत,
आजही हसताना तूच भासतेस…
सतरावी मार्च दोन हजारची,
ती तारीख मन आजही विसरत नाही,
तू गेलीस आम्हाला सोडून आक्का,
पण तुझी माया कधीच दूर गेली नाही…
कितीही मोठा झालो तरी आक्का,
मन आजही तुझे लेकरूच आहे,
संकटात नकळत ओठांवर येणारा,
“आक्का…” हा शब्दच माझे बळ आहे.
पुन्हा जन्म मिळाला तर देवा,
एकच माझी मागणी राहावी,
माझ्या वाट्याला तीच माया यावी,
आणि माझी आक्का पुन्हा मला मिळावी…

डॉ. ज्ञानेश्वर माशाळकर
उमरगा, जि. धाराशिव

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 3 3 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे