Breaking
ई-पेपरकवितानांदेडमराठवाडासाहित्यगंध

महाराष्ट्र माझा

बळवंत शेषेराव डावकरे

0 4 8 2 9 7

महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा अभिमानाचा
शिवबांच्या वीर पराक्रमाचा
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा
वारसा नांदतो संतपरंपरेचा

महाराष्ट्र माझा संस्कृतीचा
अठरापगड जातीधर्माचा
नानातऱ्हेच्या सणावारांचा
पेरतो संदेश एकात्मतेचा

महाराष्ट्र माझा बहुमानाचा
नारीशक्तीच्या कर्तृत्ववाचा
क्रांतीज्योती सावित्रीबाईचा
अहिल्याबाईच्या वीरतेचा

महाराष्ट्र माझा लेखणीचा
भीमरायांच्या संविधानाचा
क्रांतीच्या ज्योतीरावांचा
अण्णाभाऊंच्या पोवाड्यांचा

महाराष्ट्र माझा कृषकांचा
अन्नदात्या बळीराजाचा
सीमेवरच्या वीर जवानांचा
पिढी घडवणाऱ्या गुरुजनांचा

बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड, जि. नांदेड
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे