Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांची दिव्यांग साप्ताहिक संवादच्या मुख्य सल्लागारपदी नियुक्ती

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

0 4 8 3 0 0

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांची दिव्यांग साप्ताहिक संवादच्या मुख्य सल्लागारपदी नियुक्ती

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

पुणे (दि ६ जाने) : आंतरराष्ट्रीय मधुकर्णिका समाज माध्यम जीवन गौरव पुरस्कारप्राप्त आणि विश्वविक्रमी डहाळी अनियतकालिकाचे संपादक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांची नुकतीच ‘ दिव्यांग साप्ताहिक संवाद ‘ च्या प्रमुख सल्लागार पदावर नियुक्ती करण्यात आली असल्याचे संपादक भूषण ठाकूर,नागपूर यांनी कळवले आहे.

डाॅ.मधुसूदन घाणेकर गेली 50 वर्ष मानद संपादन, मानद पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. महाविद्यालयीन पातळीवर निनाद हस्तलिखित, सुगावा दिवाळी अंक, ग्रहांकित तसेच ब्रह्मलिखित मासिक, पूरिया धनश्री, कवितेच्या प्रदेशात , मजदूर वार्ता आदि संदर्भात संपादक, कार्यकारी संपादक , वृत्त संपादक,अतिथी संपादक, अशा विविध पातळीवर जबाबदा-या यशस्वीरित्या सांभाळल्या आहेत.

कामगार संघटना तसेच साहित्य ,ज्योतिष आणि सांस्कृतिक-सामाजिक आदि संदर्भात जाहिर पत्रकार परिषदा घेतल्या आहेत, प्रसिध्दीप्रमुख म्हणूनही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर योगदान दिले आहे. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी दिव्यांग आणि वंचित घटकांसाठी सबकुछ मधुसूदन तसेच बे दुणे चकली या विश्वविक्रमी एकपात्री कार्यक्रमांचे विनामूल्य 50,000हून अधिक प्रयोग केले आहेत.

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी दिव्यांगांसाठी झटणा-या सक्षम संस्थेसाठी मौलिक योगदान दिले आहे. नेत्रदान प्रसार तसेच अवदान प्रसार अभियान हस्ताक्षर मनोविश्लेषणाच्या माध्यामातून केल्याबद्दल त्यांच्या नावावर विक्रम प्रस्थापित झाले आहेत. डाॅ.मधुसूदन घाणेकर हे वर्ल्ड लिटरेचर , सांजभेट तसेच समर्पण या संस्थांचे संस्थापक-अध्यक्ष आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे