0
4
8
2
9
4
व्यवहारी या जगात…
लेवूनी मुखवटें इथे
फिरलो कधीच नाही॥
व्यवहारी या जगात
मी रमलो कधीच नाही॥॥॥॥
इथल्या भूलभुलैयेला
कधीच नाही भुललो॥
अल्प संतुष्टतेत रंगूनी
मी खुललो कधीच नाही॥॥॥॥
पाहूनी झगमगाट
या बेगडी दुनियेचा॥
उगीचच मनामध्यें
मी झुरलो कधीच नाही॥॥॥॥
जमिनीवर पाय रोवूनी
जीवन जगत राहिलो॥
बघूनी संपन्नता इतरांची
मी भ्रमलो कधीच नाही॥॥॥॥
लाभते कष्टात मजला
अतीव समाधान॥
सततच्या श्रमाने
मी दमलो कधीच नाही॥॥॥॥
डाॅ.नझीर शेख,राहाता
जि.अहिल्यानगर
0
4
8
2
9
4



