Breaking
कोकणखानदेशदेश-विदेशनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

‘निसर्ग रक्षण आणि संवर्धन काळाची गरज….!’;विष्णू संकपाळ

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

0 4 8 2 9 7

‘निसर्ग रक्षण आणि संवर्धन काळाची गरज….!’;विष्णू संकपाळ

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

कांही लोकांना तहान लागली की विहिर खोदायची सवय असते. मात्र यामुळे तहान तर भागत नाहीच, उलट वेळेचा आणि ऊर्जेचा अपव्यय जरूर होतो. शिवाय अशा वृत्तीच्या लोकांना समाज वेड्यात काढतो. थोडक्यात पावसाळा आला की माकड म्हणते घर बांधायला हवे होते. आणि पावसाळा सरला की म्हणते पुन्हा पाऊस आला तर बघू. या सर्व गोष्टीत खूप मोठा गर्भित मतीतार्थ आहे. तो समजून घेणे आवश्यक आहे.

एकतर कोणतीही गोष्ट वेळेत करावी. किंबहुना काळाची पावले ओळखून आपल्या गरजा आणि सुरक्षिततेचे नियोजन करावे. जेणेकरून भरपावसात बोडक्या झाडावर बसलेल्या हताश माकडासारखी आपली अवस्था होणार नाही. एखादे काम उद्या करू म्हणून पुढे ढकलाल, तर कदाचित त्यासाठी लागणारी संसाधने कुणीतरी आधीच पळवलेली असतील आणि मग दैवाला दोष देत पश्चाताप करत बसावे लागेल. इथे माकड हे आळशी मनोवृत्तीचे प्रतिकात्मक रूप आहे तर बोडके झाड हे उध्वस्त संसाधनांचे रूप आहे. जे काम आजच करायला हवे ते उद्यावर ढकलणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी.!

थोडेसे अजून खोलात जाऊन दुसर्‍या बाजूचा विचार केल्यास, आज मानवी आक्रमणात निसर्गाचा र्‍हास सातत्याने होत आहे. मोठमोठय़ा वृक्षावर कुर्‍हाड चालवताना बुद्धिवादी माणूस हा विचार करत नाही की, आपण कुणाचा तरी अधिवास उध्वस्त करत आहोत. त्या नैसर्गिक संसाधनातून स्वतःची घरे वसवताना मुक्या पशुपक्ष्यांचे निवारे नष्ट झाल्याने हे मुके प्राणी निराधार, बेघर होत आहेत..हीच गोष्ट दुर्लक्षित होत आहे.
“झाडे लावा झाडे जगवा” या घोषणा केवळ प्रदर्शनीय होत असून लावलेले झाड जगले की नाही हे पाहण्याची जबाबदारी मात्र कुणी गांभीर्याने घेताना दिसत नाही. निसर्ग रक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे..!

मानवी दृष्टी
भूतदया जपावी
रक्षावी सृष्टी..

काल ‘शुक्रवारीय हायकू’ स्पर्धेसाठी आ. राहुल सरांनी दिलेले चित्र या सर्व पार्श्वभूमीवर कमालीचे बोलके आहे. एका वाळलेल्या बुंध्यावर बसलेले माकड. या चित्रातून अनेक भाव प्रकट होतात. आणि यातून हायकू द्वारे अनेक अंगाने दिव्य संदेश देता येण्यासारखे आहेत.. अर्थात अनेक हायकूकारांनी विविध पैलू दर्शवणार्‍या खूप सुंदर रचना केल्या आहेतच. हायकू तज्ञांच्या मते, हायकू लिहिताना वर्णनात्मक किंवा उपदेशात्मक रचना नको तर त्यात गर्भित अर्थ असावा. जो वाचकाला प्रेरीत करेल. अत्यंत मोजक्या शब्दात शब्दापलिकडले व्यक्त करण्याचा प्रयत्न हायकूमध्ये दिसला पाहिजे. सर्व हायकूकारांना यासाठी भरभरून शुभेच्छा. आणि आज मला परिक्षण लिहिण्याची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादा आणि समूह प्रशासनाचा मी आभारी आहे.

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे