0
4
8
2
8
6
कुणा समजले काय,?
विश्वास दाखवून गेले कैक,
करूनिया हो विश्वासघात…
प्रेमभाषा आणि भावनांची,
देऊन खोटी खोटी सौगात…१
बळी पडलो त्या व्यूहामध्ये,
समजू शकलो नाही डाव…
सहज रचून गेले फसवे,
दावून रंगविलेले गाव…२
नाही कळले भोळ्या जीवाला,
कोण करून गेलाय घाव…
भोळ्या जीवाची भोळी भावना,
आणि होता प्रितीचाच भाव…३
कुणा समजले काय?सांगा,
कोण खरे कोण खोटे किती?…
‘सुधाकरा’ …..श्रेष्ठ ठरतेय,
आपमतलबी….दुष्ट नीती…४
सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर नागपूर
=========
0
4
8
2
8
6



