ई-पेपरकविताकोकणपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
कशा बदलल्या वाटा
पांडुरंग एकनाथ घोलप रोहोकडी,ता.जुन्नर, जि.पुणे
0
4
8
2
8
6
कशा बदलल्या वाटा
घडले अकल्पित काही
कशा बदलेल्या वाटा
आपलेच झाले फितूर
पायी सलतो काटा
झिजविला देह अखंड
आपले म्हणून सार्यांना
पेलली आव्हाने सारी
शह दिला ग्रह ताऱ्यांना
उपकाराची नव्हती अपेक्षा
हवी होती संकटात साथ
गरज होती खरी जेव्हा
केले साऱ्यांनी वर हात
स्वार्थी मायाबाजार हा
मी हमाल भारवाही होतो
मदतीला ना आले कोणी
आता मीच मला सावरतो
येईल आधारास कोणी
आशावाद ठरला खोटा
गरजेच्या वेळीच साऱ्यांनी
कशा बदलल्या वाटा
पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी,ता.जुन्नर, जि.पुणे
===
0
4
8
2
8
6



