कवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रसाहित्यगंध
भास आनंदाचा; सिंधू बनसोडे
0
4
8
2
8
6
भास आनंदाचा
भाव ,स्पर्श,शब्द ,अर्थ
उमजून हृदयी बसतो
भ्रमाचे गणित न उमजता
उगाच व्याकरणात रमतो
का,कसे , कधी,कुठं, केव्हा
अजूनही प्रश्नात गुरफटतो
भाव वेगळा ,अर्थ वेगळा..
तेव्हा भास आनंदाचा उरतो
मी,माझा,मला ,आमचे
नात्याच्या बंधात आडवे येते
कसला संबंध कुठे उरतो…
तऱ्हा ती दुजेपनाचीओळख होते
नवरसांचे गुण अवगुण
कमी अधिक रसात रंगतो
जगणं की वागणं…
सोडून देता पुन्हा धरतो
हाच आनंदाचा भास की
भ्रमारचे भ्रमण ते…
सुखाच्या सरी होवून जाई
मृगजळच क्षण ते..
सिंधू बनसोडे
इंदापूर,जि.पुणे
0
4
8
2
8
6



