Breaking
आरोग्य व शिक्षणछत्रपती संभाजी नगरदेश-विदेशनवी दिल्लीनागपूरमहाराष्ट्रमुंबई

औरंगजेबाची कबर राष्ट्रीय स्मारकाच्या व्याखेत बसत नाही; उच्च न्यायालयात याचिका

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

0 4 8 2 8 4

औरंगजेबाची कबर राष्ट्रीय स्मारकाच्या व्याखेत बसत नाही; उच्च न्यायालयात याचिका

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

मुंबई: मुघल सम्राट औरंगजेबाच्या कबरीचा वाद विकोपाला गेला असता, नागपूरमध्ये दोन गटात हाणामारी होऊन दंगल घडली. यास कारणीभूत हा कबरीचा वाद असल्याने कबर हटविण्याची मागणी सतत जोर धरू लागली असल्याने यावर ठोस निर्णय कधी लागेल याबाबत सध्यातरी कुणीही राजकारणी बोलत नाही. नागपुरात झालेली दंगल ही घडवून आणल्याच्या बातम्याही समाज माध्यमात पसरत आहे.

मुघल बाहशाह औरंगजेब याची खुलताबाद येथे असलेली कबर राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत बसत नाही. त्यामुळे ती हटवण्याचे आदेश भारतीय पुरातत्व विभागाला (एएसआय) द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या कबरीपासून पुढल्या पिढीने वारसा म्हणून काही घ्यावे किंवा शिकवण घेण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे, या कबरीला ऐतिहासिक वारसा वास्तू किंवा राष्ट्रीय स्मारकांच्या यादीतून वगळण्यात यावे. अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे