Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

राज्यातील ३७ महिलांना ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कार’

वसुधा नाईक प्रतिनिधी, पुणे

0 5 1 8 0 3

राज्यातील ३७ महिलांना ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कार’

जागतिक महिला दिनानिमित्त स्पर्धेचा निकाल जाहीर

वसुधा नाईक प्रतिनिधी, पुणे

बिनधास्त न्यूज नेटवर्क

पुणे: ( दि ८ मार्च) शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन आणि यशिता गार्डन नर्सरी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२६’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज जागतिक महिला दिनानिमित्त या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.

राज्यातील महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती इतरांना व्हावी, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील ३७ महिलांना ‘कर्तृत्ववान महिला’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

पुरस्कार प्राप्त महिलांमध्ये : डॉ. नाझिया माजिद सय्यद (नाशिक); वनश्री साहेबराव महालकर (यवतमाळ); ताई सुरेश लांडे (धाराशीव); सौ. रोहिणी अमोल पराडकर (मुंबई); वंदना सालवटकर (वर्धा); संगीता तुळशीराम पवार (मुंबई); सुरेखा तात्याबा चौरे (सोलापूर); सरला शामराव कामे (छत्रपती संभाजीनगर); दुर्गा योगेश गाडेकर (बुलढाणा); जया अरुण बळी (बुलढाणा); निर्मला दिलीपराव नंदुरकर (वर्धा); विद्या कृष्णराव वालोकर (वर्धा); अस्मिता विठ्ठलराव क्षीरसागर (बुलढाणा); उमा भाऊराव पाटील (छत्रपती संभाजीनगर); कविता प्रकाश खैरनार (नंदुरबार); अश्विनी विशाल गिरी (नंदुरबार); मंगला गजानन डगवार (वर्धा); वर्षा सुरेशराव पवार (नंदुरबार); प्रियदर्शिनी नामदेवराव झोड (अमरावती); सौ. निर्मला रमेश मचाले (पुणे); पूजा प्रभाकर पवार (नाशिक); यशोधरा महेंद्र सोनेवाने (गोंदिया); सागीरा नियाजुद्दिन सिद्दिकी (वर्धा); सीमा गिताराम मेहत्रे (लातूर); सौ. वैशाली तुषार लांजेवार (वर्धा); भारती युवराज मराठे (नंदुरबार); स्वाती अरविंद वानखडे (अमरावती); कांचन सुनिल जाधव (रत्नागिरी); अनुश्री अरविंद कोपरे (वर्धा); मीना विजय सोनकुसले (अमरावती); रितू गंगाराम पुजारी (यवतमाळ); वसुधा वैभव नाईक (पुणे); . डॉ. वैशाली शांताराम शिंदे (नंदुरबार); मेधा निलेश चिटगोपेकर (नागपुर); पोलीस उपनिरीक्षक सोनी सदाशिव शेट्टी (ठाणे); डॉ. सुमन नवलकर (मुंबई); वंदना विनोदकुमार नरळे (रायगड) यांचा समावेश आहे.

पुरस्कार विजेत्यांचे मातृसेवा फाउंडेशनच्या संध्या सावंत, यशिता गार्डन नर्सरीचे अथर्व यशवंत गडवार, शिक्षक ध्येयचे मधुकर घायदार; प्रभाकर कोळसे, कविता चौधरी, सुरेखा उजगरे, डॉ. फकिरा राजगुरू, डी. जी. पाटील, राजेश चायंदे, प्रेमजीत गतीगंते, भाग्यश्री पवार, मेघा पाटील, विलास मेश्राम, श्रद्धा पवार, अशरफ आंजर्लेकर, अर्चना भरकाडे, महेंद्र सोनेवाने आदींनी अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे