
0
5
1
8
0
2
चूल
जुनं तेच सोनंरे ,करु नकोच भूल।
घरात पेटवारे ,ती प्रेमभरी चूल।।
गँस सिलेंडरचा तू ,दे सोडूनीया नाद।
चुलीचे अन्नचा , मस्तच लागे स्वाद।।
काड्या गव-याने ,स्वयंपाक तू कर।
पोटभर जेवूनी मग ,दे मस्त ढेकर।।
माऊली शिजवते ,मिष्टान्न ते चवीचे
प्रेमानं हर्षानेच ,अन् आपुलकीचे।।
जिव्हाळाचे जुळे तेव्हा कुटुंबाशी नाते।
मत्सर ईर्षा द्वेष ,त्या धुपटात जाते।।
विस्तवाची धग, बसे हाताला चटके।
सुखाचा वाटतो, तो ,घासही हटके।।
चुलीच्या अन्नाची ती तृप्तीच न्यारी
चला करु आता ,या चुलीसाठी वारी।।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा.जि यवतमाळ
0
5
1
8
0
2



