Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनागपूरब्रेकिंगमहाराष्ट्रविदर्भ

दृष्टिहीन जलतरणपटू ‘ईश्वरी पांडे’चा संघटनेकडून सत्कार

नागपूर शहर प्रतिनिधी

0 5 4 1 0 6

दृष्टिहीन जलतरणपटू ‘ईश्वरी पांडे’चा संघटनेकडून सत्कार

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

नागपूर : (दि १२) अथांग सागर, पावसाळी वातावरण, उसळणाऱ्या प्रचंड लाटा तसेच डॉल्फिन, शार्क व जेलिफिशसारख्या महाकाय समुद्री जीवांचा धैर्याने सामना करत नागपूरची दृष्टिहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिने अतिशय कठीण समजली जाणारी तलाईमन्नार (श्रीलंका) ते धनुष्कोडी (भारत) ही २९ किलोमीटर अंतराची पाल्क सामुद्रधुनी यशस्वीरित्या पार केली.

हा भीमपराक्रम करणारी ती जगातील पहिली दृष्टिहीन जलतरणपटू ठरली आहे. ईश्वरी पांडेच्या या ऐतिहासिक यशाबद्दल तांत्रिक कामगार युनियन व तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनच्या वतीने तिचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तांत्रिक कामगार युनियनचे राज्य सचिव प्रकाश निकम, तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे तसेच रितीक वानखेडे उपस्थित होते. ईश्वरी पांडेच्या या अद्वितीय कामगिरीबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 0 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे