
0
6
3
3
1
9
मी रं जगाचा पोशिंदा
भेगाळलं रान सारं
ये रे ढगा उतरून
पाज पिकाले तू पाणी
नको टाकू करपून…!!
दारी सावकार येतो
व्याज त्याचं कसं भरू
झोप माही उडाली रं
संसार ह्यो कसा करू…!!
पोरगा मागे पुस्तकं
खिशात नाही रं पैसा
येऊ दे रं देवा कीव
पाड पाड रं पावसा…!!
पोर लग्नाला रं आली
आहे नोकरी मुलाला
नाही फुटली सुपारी
हुंडा नव्हता द्यायला…!!
आशा एकच मनात
ठीक होईल रं औंदा
लढणार दुष्काळासी
मी रं जगाचा पोशिंदा ..!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
==========
0
6
3
3
1
9



