ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध
चिंगी
भुमेश्वरी सातपुते (खोंडे) ता.उमरेड जि. नागपूर

0
6
3
3
1
5
चिंगी
एक होती चिंगी
खूप खूप शहाणी
आईला म्हणायची
पुरव एक मागणी
नको ती बाहुली
नको ती खेळणी
अ,आ,इ गिरवाया
हवी मला लेखणी
नको नवे कपडे
नको मला खाऊ
विज्ञानाच्या गावा
आपण सारे जाऊ
नको गाणे- गोष्टी
नको कथा – पुराण
वाचायला दे गं आई
भारतीय संविधान
घेईल मी भरारी
आहे मला खात्री
एक दिवस होईन
मी अवकाशयात्री
भुमेश्वरी सातपुते (खोंडे)
ता.उमरेड जि. नागपूर
=========
0
6
3
3
1
5



