Breaking
कवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

चंद्रावरचा ससा; शर्मिला देशमुख

बीड

0 4 8 2 9 3

चंद्रावरचा ससा

चंद्रावरचा ससा
पृथ्वीवर आला
हिरवळ पाहून इथली
इथेच रमला

लाल लाल गाजरे
आवडले त्याला
लुसलुशीत हराळी
म्हणे खेळायला चला

त्यांच्याकडे पाहून सारे
अचंबित झाले
कुठून आला हा
विचारू लागले

वाढत चालली गर्दी
पाहण्यास त्याला
त्याला काही समजेना
म्हणे काय झाले मला

अरे तुम्हाला सांगायचे
राहूनच गेले
मी आहे चंद्रावरचा
तुमचे घर आवडले

राहू का तुमच्यासंगे
सांगा चार दिवस
पाहून आनंद घेऊन
जातो मग वापस

आम्ही म्हणालो त्याला
आता रहा इथेच
चंद्रावरचा ससा आता
जाईना कधी कुठेच

कायमच राहिला
आता तो पृथ्वीवर
काने दोन उगवली
त्याच्या अँटीन्यावर

शर्मिला देशमुख,बीड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे