अलिबागई-पेपरकविताकोकणदेश-विदेशनागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
लेक जाताना सासरी
श्री.पांडुरंग एकनाथ घोलप
0
4
8
2
9
0
लेक जाताना सासरी
गहिवरले ते क्षण सारे
लेक जाताना सासरी
सुने झाले घर कसे
झाली रिकामी ओसरी
लाडाकोडात वाढली
प्रेम सुखात नाहली
आता परक्याचे धन
लेक सासरी निघाली
मायबापाच्या डोळ्यात
आला आठवांचा पूर
लग्न मंडपी निनादले
मंगलाष्टकांचे हे सूर
मातापित्याच्या छायेचा
काळ सुखाचा संपला
सजून नटून आज ही
लेक चालली सासरला
गहिवरल्या शब्दांचाच
लेकीला आशीर्वाद पहा
जा सुखाने मुली तू
दिल्या घरी सुखी रहा
श्री.पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी,ता.जुन्नर, जि.पुणे
=======
0
4
8
2
9
0



