ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध
बहुमताने
वृंदा(चित्रा)करमरकर ता. जिल्हा सांगली
0
4
8
2
9
0
बहुमताने
निवडणुकीचे पडघम वाजले
उमेदवार आता जागे झाले
प्रचाराचे नारळ फुटताच
कार्यकर्त्यांनी दंड थोपटले
आम्हा निवडून द्या बहुमताने
मतांचे जोगवे मागू लागले
आश्वासनांचे पेवच फुटले
रणशिंग जोरात फुंकू लागले
मेजवान्यांना ऊत येईल
दारु मटण पार्ट्या होतील
मतदान संभ्रमात पाडण्याचा
उद्योग जोमाने सुरु होईल
मतदारांनो व्हा तुम्ही सावध
बळी पडू नका आमिषाला
हक्क अनमोल मतदानाचा
मनी प्राधान्य द्या जनहिताला
योग्य उमेदवार तुम्ही निवडा
विवेकबुद्धी जागृत ठेवा
ही तुमची परीक्षा समजून
मतदानाचा हक्क बजावा
वृंदा(चित्रा)करमरकर
ता. जिल्हा सांगली
======
0
4
8
2
9
0



