Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

जे. एस. एम. महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

तुषार थळे, प्रतिनिधी

0 4 8 3 0 1

जे. एस. एम. महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

तुषार थळे, प्रतिनिधी

अलिबाग (दि ३१): मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी, तिचे संवर्धन करण्यासाठी प्रतिवर्षी दि. १४ जानेवारी ते २८ जानेवारी हा कालावधी “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” म्हणून साजरा करण्यात येतो.

यानिमित्ताने जे. एस. एम. महाविद्यालयात शनिवार, दि. १८ जानेवारी ते मंगळवार, दि. २८ जानेवारी २०२५ या कालावधीत ‘मोडी लिपीची ओळख’ या विषयावरील कार्यशाळा (मार्गदर्शक – प्रा. हर्षला महाजन), ‘मराठी भाषा आणि करीअरच्या विविध संधी’ या विषयावरील व्याख्यान (मार्गदर्शक – प्रा. जयेश म्हात्रे), ‘बाळगा मराठीचा अभिमान’ या विषयावरील भित्तीचित्र (पोस्टर) स्पर्धा, ‘मराठी भाषा महत्त्व व संवर्धन’ या विषयावरील रील्स स्पर्धा, मराठी भाषा व साहित्य यावरील प्रश्नांवर आधारित प्रश्नमंजुषा, अभ्यासक्रमातील नाटक विद्यार्थ्यांना दाखविणे अशा विविध उपक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

सर्व उपक्रम व स्पर्धांमध्ये मिळून एकूण १८२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांना पुस्तक व प्रमाणपत्र या स्वरुपात पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अॅड. गौतमभाई पाटील, प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, विभागप्रमुख डॉ. नीळकंठ शेरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभागातील प्रा. जयेश म्हात्रे, प्रा. सुरभी वाणी, प्रा. हर्षला महाजन यांनी या कार्यक्रमांचे व सर्व स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे