0
4
8
2
9
0
मनोरथ
नुकतेच कुठे
अंकुरले बीज
कोसळली वीज
स्वप्नावरी….
उरातले स्वप्न
राहिले अपुरे
स्वप्नांचे मनोरे
ढासळले…
जीवनाचा पथ
रक्ताने माखला
आप्तांनी टाकला
तिमिरात….
मार्गातील काटे
अडविली वाट
करुणेची लाट
ओसरली……
आयुष्यात बाकी
अखेरची सांज
ठरवूनी वांझ
मनोरथ…
अरविंद उरकुडे
गडचिरोली
=====
0
4
8
2
9
0



