Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

सेवादान

सरला टाले राळेगाव यवतमाळ

0 4 8 3 0 0

सेवादान

पुण्य पडावे पदरी म्हणून
की झाकण्यासाठी पाप
कोणी करिती अन्नदान
कोणी करिती द्रव्यदान
खरे पुण्य मिळते त्याला
जो करतो सेवादान … . . . .
लग्न , वाढदिवस , असो नामकरण
वास्तूशांती वा तेराव्याचे जेवण
भरल्या पोटास भरवण्यापेक्षा
रंजल्या – गांजल्यांसाठी करावे
स्वयंपाकाचे उघडे दालन … . .
म्हाताऱ्यांची करून सेवा
समाधान पहावे त्यांचे तेव्हा
रुग्णांस थोडा धीर द्यावा
गरिबांस थोडा हात द्यावा . . . .
राबणारा तो मजूरवर्ग
कष्टाने सजवितो घराचा स्वर्ग
माणूसकीने वागवून त्यांस
जीवनी धरावा सन्मार्ग … .
दिखाऊपणाच्या बाजारात
स्पर्धेच्या या झगमगाटात
मिळतील कित्येक पुरस्कार
पण … मनामनात मिळेल मान
मनापासून जेव्हा करू सेवादान … .

सरला टाले
राळेगाव यवतमाळ
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे